गोलूभाऊ गेडाम यांची फोरम च्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति

तालुका प्रतिनिधि नागेन्द्र चटपल्लीवार
भद्रावती : भद्रावती येथिल सुपरिचित व नवीन उदयास येत असलेलं नेतृत्व श्री गोलूभाऊ गेडाम यांची भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति करन्यात आली आहे. सदर नियुक्ति फोरम चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांचे आदेशानुसार करन्यात आली असुन संंपुर्ण फोरम कोअर कमेटी चे समर्थन आहे.या नियुक्ति मुळे फोरम च्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण असुन नविन जिल्हा अध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोलुभाऊ गेडाम भद्रनाग वार्ड चे रहिवासी असुन त्यांचा आदीवासी समाजात प्रभाव आहे.ते अनुसूचित जाति जमाती दक्षता समिति चे सदस्य असुन गोंडी धर्मीय आदीवासी बहुउद्देशीय संघटनेचे सचिव आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया द्वारा 3 ऑक्टोंबर ला गांधी चौक चंद्रपुर येथे EVM हटाओ देश बचाओ निषेध आंदोलन करन्यात येनार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांच्या ऊपस्थितीत फोरम चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री गोलुभाऊ गेडाम यांचे स्वागत व सत्कार होईल. नियुक्ती पत्र व ओळख पत्र प्रदान करन्यात येनार.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची कोअर कमेटी – अरशद भाई कच्छी, शोएब भाई कच्छी,देवाभाऊ हिंगोरानी, दिनेशजी मिश्रा, सफुरुद्दीनजी ख्वाजा, संजयजी मार्टिन, नागेन्द्र चटपल्लीवार, जुनैद खान, सरफराज खान पठाण, सुनील रामटेके, जितेंद्र गुलानी, दयारामजी टेंभुर्णे, प्रविणजी माटेटवार, महिला फोरम कमेटी – विभाजी बेहेरे,जयाजी मेश्राम, कल्पनाजी निशाने, वंदनाजी ऊईके, सुजाताजी बगडे ई.पदाधिकारी व सदस्यांनी नविन जिल्हा अध्यक्षांचे अभिनंदन करुन फोरम मधे स्वागत केले आहे.

