google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची मासिक आढावा बैठक संपन्न

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

चंद्रपुर : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांचे मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर ला रामबाग गेस्ट हाउस चंद्रपुर येथे फोरम ची मासिक आढावा बैठक तथा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

 

सुत्रसंचालन व प्रास्ताविकातुन केंद्रीय कोअर कमेटी सदस्य तथा भद्रावती तालुका अध्यक्ष नागेन्द्र चटपल्लीवार यानी फोरमची दीशा स्पष्ट केली.आज पर्यंत फोरम ने केलेल्या कार्याचा आढावा दिला.यामुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना फोरम चे महत्व पटले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करने हा बैठकीचा मुख्य ऊद्येश होता.मागिल महिन्यात फोरम च्या चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदी विनोद ऊर्फ गोलू गेडाम यांची नियुक्ति झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात फोरम ची पकड मजबूत करने सुरु केले. राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी व राष्ट्रीय युवा अध्यक्ष अरशदजी कच्छी यांचे मार्गदर्शनाखाली फोरमच्या महत्वपूर्ण नियुक्ति करन्यात आल्या. त्याच प्रमाणे :
फोरम युवा विभाग चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदी राहुल रवि ताल्लावार यांची नियुक्ति करन्यात आली.

फिरोज खान मोहम्मद उस्मान खान यांची चंद्रपुर जिल्हा निरीक्षक तथा विषेश प्रतिनिधि या पदावर नियुक्ति करन्यात आली आहे.विलास नामदेवराव परचाके यांची वरोरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करन्यात आली आहे.

ओंकेश्वरी आदर्श भैसारे यांना चिमुर महिला तालुका अध्यक्षा पद बहाल करन्यात आले तर रुक्मिणी दीपक पिंपळकर यांची भद्रावती तालुका महिला अध्यक्षा पदावर नियुक्ति करन्यात आली आहे. सदर नियुक्ति मुळे फोरम मधे चैतन्याचे वातावरण असुन नविन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

” *गांव तिथे फोरम ” अभियान* पुर्णत्वास नेन्याचा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
फोरमचा विस्तार करने ही काळाची गरज असल्याचे मत भद्रावती तालुका उपाध्यक्ष सुनील रामटेके यांनि व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांनी-
” देशात व राज्यात परिस्थिति वाईट असुन सरकार विद्यार्थी, शेतकरी व महिलांवर अन्याय करीत आहे,देशाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार तारुण नेवू शकते.” असे मत व्यक्त केले.

बैठकीला अरशद भाई कच्छी युवा राष्ट्रीय अध्यक्ष, शोएब भाई कच्छी राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख, संजयजी मार्टिन केंद्रीय सदस्य, सागरजी बेले, विनोद ऊर्फ गोलू गेडाम चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, राहुल रवि ताल्लावार चंद्रपुर जिल्हा युवा अध्यक्ष,जूनैद खान पठाण चंद्रपुर महानगर अध्यक्ष, सुनील रामटेके भद्रावती तालुका उपाध्यक्ष, सरफराज खान पठाण भद्रावती शहर अध्यक्ष, विलास नामदेवराव परचाके वरोरा तालुका अध्यक्ष, अब्दुल रहमान शेख, मजीद खान पठान, ई. ऊपस्थित होते.

Share
Back to top button