google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

आरमोरी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस काॅन्स्टेबल निलंबित

निलंबित होण्याची खरं कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याची चर्चा

आरमोरी शहरात दोन्ही काॅन्स्टेबलच्या निलंबनाची जोरदार चर्चा.

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी ) दि. २४/९/२०२६:- गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हा विषय फार गंभीर आहे. जिल्ह्यात कागदोपत्री दारूबंदी असली तरी आजही जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलीसांनी छापे मारून अवैध दारू पकडून गुन्हे दाखल केले आहेत. आरमोरी शहरातील आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीसांनी छापे टाकून लाखो रुपयांची दारू पकडून जप्त केली आहे . तरिही अवैध दारू विक्रीवर पुर्णतः आळा बसणार नाही. हे तेवढेच सत्य आहे. शासन दारू बंदी करण्यासाठी दिंडोरा कथित असले तरी दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्या सरकारच्या आशिर्वादाने सुरूच आहेत.

 

गडचिरोली जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले दोन पोलीस काॅन्स्टेबल निलंबित करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून त्यात दिनेश भोसले आणि दिलीप लंबुवार यांचा समावेश आहे. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जनक यांना निलंबनाबाबत माहिती विचारली असता त्यांनी दुजोरा दिला. निलंबित करण्यात आलेल्या या दोन्ही काॅन्स्टेबलच्या निलंबनाची मागणी कोणी केली होती. निलंबनाची कारणें काय होते. या निलंबनाच्या कारवाईत पुन्हा एका पीएसआय ला का सोडण्यात आले? अशी ही चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. निलंबित करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप लंबुवार आणि दिनेश भोसले यांनी कर्तव्यात कसूर केला होता की कामात हलगर्जीपणा केला होता ?? भ्रष्टाचार किंवा लाचखोरी केली होती का..?? यांचेमध्ये गैरव्यवहार की बेशिस्तपणा होता का?? हे मात्र समोर आले नाही मात्र याबाबत सत्यता लवकरच उघड होणार आहे हे निश्चित आहे.

Share
Back to top button