google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावतीत पोलीसांचा वचक नाही?

 

भद्रावती : चंद्रपुर जिल्ह्यातिल भद्रावतीची “देवनगरी” म्हणून ओळख होती.हि ओळख पुसल्या जावून भद्रावती आता “हत्या नगरी” म्हणून उदयास येत आहे.भद्रावतीत पांच सहा महिन्यानंतर हत्या होतेच. बहुचर्चित ITI समोरील मुंडके नसलेले प्रेत.झिंगुजी वार्डातील भावाने बहीण व आईची केलेली हत्या.भंगाराम वार्डात एका युवकाची पाठलाग करुन धारदार शस्त्राने केलेली हत्या विसरत नाही तोच २३ सप्टेंबरला नागमंदीर जवळ भर रस्त्यात सकाळी ७.३० वाजता एका युवकाला मोटर सायकल अडवून मानेवर वार करुन जागेवरच ठार केले.भद्रावतीला सहा महिन्यानंतर रक्तरंजित होळी होतेच.

अवैद्य धंद्यांचा महापुर
सन २०२२ ला शहराच्या बाहेर पोलीस स्टेशन गेल्या पासुन गुन्हेगारी प्रवृत्तिने डोके वर काढले असुन येथे अनेक अवैद्य धंद्यांचा महापुर पहायला मिळतो. भद्रावती पोलीस स्टेशन कारभाराबाबत जनतेत असंतोष असुन नागरिक तर पोलीस स्टेशनलाच अवैद्य धंद्यांचे माहेरघर मानते. भद्रावती पोलीस स्टेशन मधे कायदा विकत मिळतो, अवैद्य धंदे जोरात पोलीस कोमात,असे अनेक तर्क वितर्क पोलीसांच्या कामगिरीवर केले जातात. शहरात अनेक अवैद्य धंदे जोरात सुरु आहेत.मुख्य रस्त्यावर अनियंत्रित वाहतुक,जड वाहनांची बेकायदेशिर वाहतुक,अंमली पदार्थ (गांजा) विक्रि,शहरा बाहेरील ढाब्यांवर अवैद्य दारु विक्री,पिपराडे मंगल कार्यालय परीसरात हाय वे ला लागुन खुलेआम सट्टापट्टी,लाॅजमधे वेश्या व्यवसाय ई. अवैद्य धंद्यांची चौकशी करुन कडक कारवाई करने आवश्यक आहे.नेहमीसाठी.

मध्यभागी पोलीस चौकी ऊभारा

शहराचे मध्यभागी पोलीस स्टेशन होते तेव्हा कायदा व सुव्यवस्था नियंत्रित होती. शहराबाहेर पोलीस स्टेशन गेल्यापासुन शहरात कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत.मध्यभागी सराफा मार्केट आहे,मोठमोठी प्रतिष्ठाने आहेत.मध्यरात्री दोन तिन वेळा पोलीस गस्तीचे सायरन ऐकु यायचे. आता तर सायरन ऐकायला कान आहेत पण सायरन नाही.शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांची भिती दुर करन्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहन्या साठी भद्रावती शहराचे मध्यभागी आंबेडकर चौक ते नागमंदीर चौक पर्यंत पोलीस चौकी ऊभारने अत्यंत आवश्यक आहे. चौकी ऊभारुन नागरिकांना अभय देने हे पोलीसांचे कर्तव्य आहे.

Share
Back to top button