आपसी वादातून भावानेच केली भावाची गोळी मारून हत्या

चंद्रपूर – गुन्हेगारीप्रवृत्तीचे असलेल्या दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी मारून हत्या केल्याची घटना आज बुधवार दि. 30 जुलै रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास जुनोना येथील वित्तुबाबा मंदिरा परिसरात घडली. बुद्दासिंग टाक रा. जुनोना असे मृतक इसमाचे नाव आहे तर सोनुसिंग टाक असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार आज दोघाही भावात आपसी वाद झाला. हा वाद ऐवढ्या विकोपाला गेले ही लहान भावाने मोठ्या भावाला गोळी मारून ठार केले.
मृतक व आरोपी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे . विशेष मंजे आरोपी सोनुसिंग टाक यांचेवर नुकताच जिल्ह्यातुन हड्डपार च्या आदेश निर्गमीत करण्यात आला होता . घटनेची माहिती मिळत्याच पोलिस अधिक्षक सुर्दशन मुमक्का, अप्पर पुलिस अधीक्षक ईश्वर कातकाळे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलिस निरीक्षक आसीफ राजा यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा तपास करीत आहे.