
घुग्घूस :- शहरातील बस स्थानक परिसरातील मुख्य चौकात लॉयड्स मेटल्स कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने रात्री 9 : 45 च्या जवळपास दुचाकीने जाणाऱ्या वेकोली कर्मचारी मुंगोली निवासी संजय पाल, उद्धव मोरे,यांच्या दुचाकीला भिषण धडक दिली यात दुचाकी वर स्वार दोन्ही व्यक्ती भीषण रित्या जख्मी झाले.
या अपघातात दुचाकी वर स्वार दोघांचे ही पाय पूर्णतः मोडले गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता अपघातग्रस्त व्यक्तींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हालविण्यात आले आहे.
ट्रक चालक (ड्राइवर ) पोलिसांच्या ताब्यातुन फरार झाल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे.