चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी पदावर राहून ठेकेदार करीत आहे कोट्यधीश रुपयाची लूट चौकशी होणार का?

चंद्रपूर :- चंद्रपूर पाटबंधारे विभाग चे कार्य अतिशय महत्त्वाचे असून शेतकरी तसेच उद्योगाला पाणी पुरवठा करणे आणि पाऊस पडला तर त्या पाण्याचे सुरक्षित रक्षण करणे या करिता संपूर्ण जिल्ह्यातील नदी आणि मोठे स्वरूपाचे बंधारे आणि गावातून वाहणारे नाले यांचे पूर्ण रूपाचे बांधकाम करून मोठे मोठे पानीचे टँक निर्माण करून पाणी साठा झाल्या नंतर शेतकरी व मोठ मोठ्या उद्योगाला पाणी पुरवठा करून पाणीचे कर वसुली करण्यात येत असून या करीता राज्य शासना तर्फे दर वर्षी कोट्याधीश रुपयाची योजना तयार करून विभाग प्रमुख यांना आदेश पत्र देतात.
पण या आदेश पत्राची अमाल बजावणी फक्त विभाग प्रमुख स्वता साठी करतात असे अनेकदा दिसून आले आहे.? पण त्याचे उलट दर्शन सुद्धा वेळी पाटबंधारे विभागात चर्चा च्या माध्यमातून समोर येत आहे.
जे अधिकारी अभियंता या पदावर आहे तो स्वतः आपल्या इतर नातेवाईक व इतर मित्राच्या नावाने कामाचे ठेके घेऊन आपले खासम खास उपअभियंता यांना जवळ करून आणि राजू किल्लवार सारख्या कार्यरत कर्मचारी यांना समाविष्ट करून कोट्याधीश रुपयाची महा भ्रष्टाचारी योजना राबवून राज्य शासनाला चुना लावत आहे. व तसेच उपअभियंता यांचे सुद्धा नातेवाईक यांना अनेक वर्षा पासून ठेकेदार बनवून ठेवले आहे अशी चर्चा सध्या पाटबंधारे विभाग चंद्रपूर येथे जोमात सुरू आहे.
याची पृष्ठी करून सत्यता जनतेचे समोर आणण्याकरिता उपविभागीय कार्यालय सावली अंतर्गत वर्ष 2020 ते मार्च 2023 पर्यंत झालेल्या कामाचे लेखा परीक्षण अहवाल आणि लेखा परीक्षण टिपनी सह झालेल्या टीपंनी कार्यवाही अहवालाची चौकशी करण्यात यावी जेणेकरून शेतकरी तथा बेरोजगार अभियंत्याला न्याय मिळेल. वर्तमान अभियंता व उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभागाची कर्मचाऱ्याची पक्षपात न करता चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी तथा बेरोजगार अभियंता करीत आहे