नुसरत जहांगीर खान नागपुर तर गोलू गेडाम चंद्रपुर फोरम चे नविन जिला अध्यक्ष

देवाभाऊ हिंगोरानी द्वारा
चंद्रपुर : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांचे मार्गदर्शनाखाली व संंपुर्ण फोरम कोअर कमेटी च्या संमतीने फोरम च्या नागपुर च्या जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी श्री नुसरत जहांगीर खान यांचेवर तर चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी श्री गोलू ( विनोद ) गेडाम यांचेवर सोपविन्यात आली आहे.
श्री नुसरत जहांगीर खान WCL येथे कार्यरत असतांना INTUC या कामगार संघटनेचे नेते होते. गेल्या महिन्यात त्यांना नागपुर येथे फोरम च्या नागपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी देन्यात आली. भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे शनिवार दिनांक ३ ऑक्टोंबर ला गांधी चौक चंद्रपुर येथे ” EVM हटाओ – देश बचाओ व बैलेट पेपर वरच निवडणूका घेन्यात याव्या ” या मागणी साठी धरणे आंदोलन कार्यक्रम दरम्यान फोरम च्या चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी गोलू (विनोद) गेडाम यांचेवर सोपविन्यात आली.या प्रसंगी त्यांचा सत्कार करुन नियुक्ति पत्र व ओळख पत्र प्रदान करन्यात आले.
फोरम तर्फे अय्युबभाई कच्छी,अरशद भाई कच्छी, शोएब भाई कच्छी, देवाभाऊ हिंगोरानी, सफुरुद्दीनजी ख्वाजा, नागेन्द्र चटपल्लीवार, जुनैद खान, अब्दुल रहमानजी, सरफराज खान पठाण, सुनील रामटेके जितेंद्र गुलानी,विभाजी बेहेरे, जयाजी मेश्राम ई.नी अभिनंदन केले .

