google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

गुन्हे शाखा चंद्रपुर ची भद्रावतीत कारवाई

भद्रावती पोलीस फरार ..? 

भद्रावती तालुका प्रतिनिधि नागेन्द्र चटपल्लीवार

भद्रावती : स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर व स्थानीक गुन्हे शाखा उपविभाग राजुरा भद्रावतीत येवून दिवसाढवळ्या होत असलेली अवैद्य दारु वाहतुक व रेती वाहतुकीवर छापेमारी करीत आहे. स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर ने दिनांक १६ नोव्हेंबर ला ११ लाख ३७ हजार ६०० ₹ ची विदेशी दारु सहीत हुंदाई क्रेटा कार जप्त केली.

 

दिनांक १८ नोव्हेंबर ला स्थानीक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाला भद्रावती परीसरात गौण खनिजाची अवैद्य वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी नाकाबंदी करुन टाटा हाफ टन टीप्पर क्रमांक MH 34 BZ 9750 जप्त केला.

अवैद्य दारु वाहतुक कारवाईत दोघां विरोधात गुन्हा दाखल करन्यात आला आहे.कलम ६५(ई) (अ),८३ अन्वये अपराध क्र.१०६९/२६, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

अवैद्य रेती वाहतुक कारवाईत स्थानीक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने ऋषिकेश बंडु गोरे राह खापरी यांचे विरोधात भद्रावती पोलीस स्टेशनमधे १०७६/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)तसेच जमीन महसुल अधिनियमाच्या ४८(७),४८ (८) नुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

भद्रावती पोलीस स्टेशन फरार …?
भद्रावती पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्हे शाखा चंद्रपुर व स्थानीक गुन्हे शाखा उपविभाग राजुरा येवून कारवाई करु शकते मात्र भद्रावती पोलीस स्टेशन अवैद्य धंदे कां रोखु शकत नाही? भद्रावती पोलीस स्टेशन मॅनेज आहे का? राजकिय दवाबाखाली काम करते की भद्रावती पोलीस स्टेशन फरार आहे? असा सवाल येथिल नागरिक करीत आहे?

Share
Back to top button