google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

रहेबर न्यूज च्या बातमीला यश

आनंदवन चौकात अखेर ट्राफिक सिग्नल बसविण्यास सुरुवात

दिनांक : 21 नोव्हेंबर 2026 वरोरा विलास नामदेव परचाके (रहेबर न्यूज) 

 वरोरा शहरवासियांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले आहे. शहरातील सर्वात वर्दळीचा आनंदवन चौक येथे ट्राफिक सिग्नल बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. सिग्नलचे खांब उभे करण्याचे काम सुरू होताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आनंदवन चौक हा वरोरा शहराचा हृदयस्थान मानला जातो. चंद्रपूर – वरोरा – नागपूर महामार्गावरील हा चौक असल्याने येथे दिवस-रात्र अवजड वाहनांची, बसेसची, ऑटोची प्रचंड वर्दळ असते. शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि रुग्णांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत होते. याच चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त झाले होते.

रहेबर न्यूजने उठवला होता आवाज
या प्रश्नावर रहेबर न्यूजने सातत्याने आवाज उठवला होता. नागरिकांच्या मागणीला वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियानेही यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाला जाग आली आणि सिग्नलचे काम सुरू झाले.

जनतेतून आनंद व्यक्त
“हा आमच्या लढ्याचा विजय आहे. आता अपघात थांबतील. प्रशासनाचे आभार”, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

सिग्नल लवकरच सुरू होणार असून, सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन रहेबर न्यूज तर्फे करण्यात येत आहे.

Share
Back to top button