google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हादेश विदेश

दिल्ली येथिल विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यार्थ्यांना फोरम चे जाहिर समर्थन

चंद्रपुर : कांक्रोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे नेतृत्वात दिल्ली येथिल जंतर-मंतर वर गेल्या महिना भरापासुन आंदोलन सुरु आहे.या आंदोलनाला शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठींबा देवुन २५ दिवसापासुन आमरण उपोषण सुरु आहे.NEET पेपर फुटीमुळे मेहनत करुन अभ्यास करनाऱ्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

 

२० विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन बलिदान दिले आहे. याला जवाबदार देशाचे शिक्षणमंत्री यांची भ्रष्ट शिक्षण व्यवस्था व पेपर फोडनारी यंत्रणा आहे.या विरोधात देशातील विद्यार्थी पेटला असुन ” धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे” या मागणीसाठी जंतर-मंतर ते संसद भवन पर्यंत २० जुलैला आंदोलन झाले.या मोर्चाची व्यापकता व आक्रमकता ईतकी भिषण होती की, सरकार ला याची कल्पना नव्हती.संसद भवन ला चौफेर विद्यार्थी व युवकांनी घेरुन टाकले होते.

 

दुपारनंतर मोर्चा ईतका आक्रमक झाला की पोलीसांनी मोर्चा पांगविन्यासाठी बेछुट लाठीमार केला. विद्यार्थ्यांना अक्षरश: फोडुन काढले. १२ वर्षाच्या मुलीला मरे पर्यंत मारले.जवळपास १५० विद्यार्थ्यांना उपचारा साठी दवाखान्यात भरती करावे लागले.या देशात शिक्षण मागनेही गुन्हा आहे का ? हा प्रश्न भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चा सरकार ला आहे.
या आंदोलनाकडे सरकारने तर पाठ फिरविलीच पण एकाही क्रिकेट पटुने दखल घेतली नाही.बाॅलीवुड कलाकारही तमाशा पाहत राहले.

 

विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी फोरम चे १००% समर्थन असुन “शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे” यासाठी फोरम आग्रही आहे.या आंदोलनाला भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष अरशदभाई कच्छी, राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख शोएबभाई कच्छी, केंद्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा साहब, चंद्रपुर गडचिरोली निरिक्षक दिनेश मिश्राजी,केंद्रीय सदस्य संजयजी मार्टिन, केंद्रीय सदस्य नागेन्द्र चटपल्लीवार, चंद्रपुर महानगर अध्यक्ष जुनैद खान, भद्रावती शहर अध्यक्ष सरफराज खान पठाण, चिमुर तालुका अध्यक्ष दयाराम टेंभुर्णे, चिमुर शहर अध्यक्ष प्रवीण माटेटवार, भद्रावती महिला तालुका अध्यक्षा जया मुकेश मेश्राम, भद्रावती महिला शहर अध्यक्षा विभा मदन बेहरे, भद्रावती उपाध्यक्षा वंदना ऊईके, सदस्य सुजाता बगडे, भद्रावती तालुका उपाध्यक्ष सुनील रामटेके, भद्रावती शहर उपाध्यक्ष जितेंद्र गुलानी, सदस्य अरविंद खोबरे व संंपुर्ण फोरम चा पाठींबा आहे.

Share
Back to top button