google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावती महावितरण कंपनी ची दादागिरी

ग्राहकाची फोरम कडे तक्रार

भद्रावती शहर प्रतिनिधि : सरफराज खान

भद्रावती : भद्रावती महावितरण कंपनी ही मनमानी कारभार करीत असून ग्राहकांना विनाकारण त्रास देत आहे. एखाद्या ग्राहकाचे एका महिन्याचे वीज बिल थकीत असेल तर त्याला पूर्वसूचना न देता वीज कापण्यात येते,

 

आणि नंतर त्याला थकीत बिल आणि चालू महिन्याचे असे दोनही बिल ऑनलाईन पद्धतीने भरावयास लावतात. नंतर तुमचे ऑनलाईन पैसे वीज वितरण ला जमा झाले नाही सांगून पुन्हा त्यांना तेवढेच पैसे रोख (Cash) स्वरूपात भरण्यास सांगतात आणि कॅश मागतांना त्यांना सांगितले जाते की, तुम्ही ऑनलाईनने भरलेली रक्कम तुमच्या खात्यात दोन ते तीन दिवसात जमा होईल. दोन – तीन दिवस लोटूनही जेव्हा ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होत नाही आणि याचा जाब विचारल्या नंतर येथील कर्मचारी सांगतात की तुमचे पैसे परत मिळत नाही ते पुढच्या बिलात कपात होतील. जेव्हा ऑनलाईन ने भरलेले पैसे परत मिळत नाही तर मग वीज वितरण कंपनी खोटं बोलून ग्राहकांची दिशाभूल का करते? एखादा ग्राहक हा मोलमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो आणि त्याच्यासोबत अशी फसवणूक झाल्यावर त्या ग्राहकाचे डोके गरम होनार कि नाही? वरुन “आम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही आमचं काहीच वाकडं करु शकत नाही”.

 

अशी धमकीवजा दादागिरी भद्रावती महावितरणने सुरु केली आहे.

या संबंधी फोरमकडे ग्राहकाने व्यथा मांडली आहे. भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया महावितरण ला निवेदन देवुन प्रत्येक कर्मचारी ला नेमप्लेट लावुन काम करन्यास बंधनकारक करुन भद्रावती महावितरण ची दादागिरी मोडीत काढनार आहे.

Share
Back to top button