भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा पद नियुक्ति तथा परिचय मेळावा २८ जुन ला
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा होनार सत्कार

चंद्रपुर : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा विस्तार करन्याच्या दृष्टिने व चंद्रपुर गढ़चिरोली जिल्ह्यात फोरम भक्कमपने संघटीत करन्यासाठी तालुका, जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी नियुक्त झाले आहे. फोरमच्या पदाधिकारी व प्रतिनिधिंचा परिचय करुन त्यांनाओळख पत्र (IDENTIFY CARD) वितरण करन्यात येनारआहे.या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्या जानार आहे.
गडचिरोली सुरजागढ लाॅयड मेटल्स, CTPS चंद्रपुर व अरबिंदो कोळसा खदान भद्रावती या तिनही प्रकल्पातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आनन्याच्या दृष्टिने फोरम अधिक आक्रमकपणे लढा ऊभारनार.भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विस्तार कसा करता येईल व संघटनेचे कार्य जोमाणे करण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करन्यात आले आहे.मेळाव्यात कोअर कमेटी व नवनियुक्त पदाधिकाऱ्यां कडुन सुचना,मनोगते व मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
फोरम नेआज पर्यंत जे काही सामाजिक कार्य व जनहितैषी कार्य केलेले आहे,त्या बाबत कोर कमेटी कडुन आढावा घेऊन पुढिल आंदोलनाची रुपरेषा तयार करुन भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया कार्य करनार आहे.मा.अय्युब भाई कच्छी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया,मा. शोएब भाई कच्छी राष्ट्रीय प्रसीद्धी प्रमुख, मा.अरशद कच्छी राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग, केंद्रीय महानगर अध्यक्ष मा. देवेंद्र हिंगोरानी, मा.जेष्ठ केन्द्रीय कोर कमेटी सदस्य तथा भद्रावती वरोरा तालुका अध्यक्ष नागेंद्र चटपल्लीवार, चंद्रपुर- गडचिरोली संपर्क प्रमुख मा. दिनेश मिश्राजी, मा. सरफराज खान पठाण भद्रावती शहर अध्यक्ष तसेच अहेरी,आलापल्ली येथील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.नव्याने नियुक्त केलेले जुनेद खान चंद्रपुर महानगर अध्यक्ष,नरेंद्र दयाराम टेंभुर्णे चिमुर तालुका अध्यक्ष,प्रविण सुधाकराव माटेटवार चिमुर शहर अध्यक्ष, वंदना मोतीराम उईके भद्रावती महिला शहर अध्यक्षा सत्कार मुर्ती रुपाने ऊपस्थित राहनार आहे.
मेळाव्याची तारीख : रविवार २८ जुन २०२६.
स्थळ – शासकिय विश्राम गृह चंद्रपुर.
वेळ : दुपारी २.०० वाजेपासुन .
हा मेळावा यशस्वी करन्याचे आवाहन मा.शोएबभाई कच्छी व मा.देवाभाऊ हिंगोरानी यांनी केले आहे.

