google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

फरार सागवान तस्कराच्या शोधासाठी वनविभागाची बक्षीस योजना

चंद्रपूर, दि.25 : सागवान लाकूड तस्करी व अवैध वाहतूक करणारा, जिवती वनपरिक्षेत्रांतर्गत नोंद असलेला आरोपी फरार असून त्याचा वनविभागामार्फत शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपीचा ठावठिकाणा, वास्तव्य अथवा हालचालींबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास ती माहिती जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयास द्यावी.

 

माहिती देणाऱ्याच्या आधारे फरार आरोपीस अटक करण्यात अथवा त्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात यश आल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रोख बक्षिस देण्यात येईल.

 

तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख, नाव, पत्ता व इतर सर्व तपशील पूर्णत: गोपनीय ठेवण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत माहितीदाराची ओळख उघड करण्यात येणार नाही. वनसंपत्तीचे संरक्षण व वनगुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी नागरिकांनी वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.

Share
Back to top button