google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

वाहतूक पोलिस निरीक्षक पाटील यांची तत्काळ बदली करा, पोलिस अधीक्षकांना AAP चे निवेदन

| दिनांक : ०६ मे २०२५ |

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या आम आदमी पक्षाने आज, दिनांक ०६ मे २०२५ रोजी सायंकाळी मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना लेखी निवेदन सादर केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली मगनया नाका, नागपूर रोड परिसरातील रहिवासी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे निवेदन दिले.

मागील एका महिन्यात वरोरा नाका ते लखमापूर परिसरात पाच ते सात निष्पाप नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. काल याच रोडवर झालेल्या दोन स्वतंत्र अपघातांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला — एक रामनगर पोलीस ठाण्यासमोर, तर दुसरा जनता कॉलेज चौक, डॉमिनोज समोर. या अपघातांमागे रस्त्यावरील बेसुमार अवैध पार्किंग, वाहतूक पोलिसांची एकतर्फी तैनाती व प्रशासनाची निष्क्रियता हे मुख्य कारण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना या प्रश्नाबाबत पंधरा दिवसांपूर्वी तक्रार केली असता त्यांनी “हे माझ्या कार्यक्षेत्रात नाही” असे सांगून जबाबदारी झटकली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत दोन मृत्यू झाले. पाटील मागील पाच वर्षांपासून याच पदावर असून परिस्थितीत कोणताही सुधार झालेला नाही.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

१. वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पाटील यांची तात्काळ बदली करण्यात यावी. २. नागपूर रोड, बंगाली कॅम्प रोड, तुकुम रोड, मगनया नाका व शहरातील सर्व मुख्य रस्ते अवैध पार्किंगमुक्त करण्यात यावेत. ३. संध्याकाळच्या वेळी नागपूर रोडवर विशेष वाहतूक पथक तैनात करण्यात यावे. ४. जनता कॉलेज चौकासह प्रमुख चौकांमध्ये दोन्ही दिशांना ट्रॅफिक पोलीस उभे करावेत. ५. अवैध पार्किंग करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी. ६. एसटी बस व खाजगी ट्रॅव्हल्सना चौकात थांबण्यास मनाई करावी. ७. मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही व स्पीड सेन्सर बसवण्यात यावेत.

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारले असून लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्ष करतो. मात्र कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी सामान्य पक्षाचे प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराध्यक्ष योगेश गोखरे,शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा पदाधिकारी विशाल बीरामवार, इम्रान शेख इत्यादी उपस्थित

Share
Back to top button