google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
क्राईम

केबल चोर शहर पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील ओल्ड जी.एम.टी. कार्यालय परिसरात साठवून ठेवलेला बी.एस.एन.एल. चा मौल्यवान केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला असून, चंद्रपूर शहर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना वाहनासह अटक केली आहे.

 

या प्रकरणी फिर्यादी अभिजीत अशोक जिवने व्यवसाय नोकरी (बी.एस.एन.एल. ऑफिस) रा. नगीनाबाग, चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार दाखल केली. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी परिसराची पाहणी करत असताना ओल्ड जी.एम.टी. कार्यालयातील काउंटर परिसरात साठवलेला केबल माल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरट्यांनी १२०० जोडीचा केबल तुकडे लांबी २८० मीटर, किं.अं. ८,३१,३३२ रुपये तसेच ८०० जोडीचा केबल तुकडे लांबी १८६ मीटर, किं.अं. ५,४६,२८२ रुपये असा एकूण १३,७७,६१४ रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार देण्यात आली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा क्रमांक १६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (म), ३(५), भा. न्या. सं. अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर शहर पोलीसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही वेळात या गुन्ह्यातील चार आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) पयनप्पा रवी शेट्टी (वय ३५, रा. रयतवारी सावरकर नगर, माता मंदिर जवळ चंद्रपूर)
२) नितीन बाबुराव उरकुडे (वय ३३, रा. आर.टी.ओ. ऑफिस मागे, चंद्रपूर)
३) ललित रोशन देशभ्रतार (वय २३, रा. रेल्वे स्टेशन रोड उडिया मोहल्ला, चंद्रपूर)
४) विजयकुमार कार्तीकराम नैताम (वय २०, रा. प्रकाश नगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर)

आरोपींकडून जळालेल्या कॉपर केबलमधून मिळालेला तांबा (किंमत १३,७७,६१४ रुपये) तसेच अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू चारचाकी वाहन (किंमत ३,५०,००० रुपये) असा एकूण १७,२७,६१४ रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास निकोडे करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button