चिमुर मधे फडकनार फोरम चा झेंडा, जनसेवेचा वसा हाच फोरम चा अजेंडा
तालुका अध्यक्ष दयाराम टेंभुर्णे तर शहर अध्यक्ष प्रवीण माटेटवार नियुक्त

चिमुर : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ने क्रांतिनगरी चिमुर चे तालुका अध्यक्ष व चिमुर शहर अध्यक्ष यांची नियुक्ति जाहिर केली असुन चिमुर मधे लवकरच फोरम चा झेंडा फडकनार आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांनी २८ जुन २०२६ ला चंद्रपुर येथे झालेल्या फोरम च्या मेळाव्यात सदर नियुक्तिची घोषणा केली.या प्रसंगी फोरम चे युवा राष्ट्रीय अध्यक्ष अरशद कच्छी, राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख शोएब कच्छी, राष्ट्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा, केंद्रीय सदस्य नागेन्द्र चटपल्लीवार, चंद्रपुर गडचिरोली निरिक्षक दिनेश मिश्रा, केंद्रीय सदस्य संजय मार्टिन, चंद्रपुर महानगर अध्यक्ष जुनैद खान यांनी चिमुर तालुका अध्यक्ष दयाराम टेंभुर्णे व चिमुर शहर अध्यक्ष प्रवीण माटेटवार भद्रावती महिला शहर अध्यक्षा वंदना ऊईके यांचा नियुक्ति पत्र,ओळख पत्र व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना – ” चिमुरच्या जनतेनी फोरमला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास जनतेच्या समस्या मार्गी लावन्यास स्थानीक प्रशासकीय अधिकाऱ्यांना भाग पाडू”.असे मत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अय्युबभाई कच्छी यांनी “फोरमच्या माध्यमातुन जनतेने सरकारला प्रश्न विचारले पाहिजे” असे मत व्यक्त केले.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे नवनियुक्त पदाधिकारी व नव्याने फोरम मधे येनाऱ्या संंपुर्ण पदाधिकारी व सदस्यांचा फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी व फोरमच्या केंद्रीय कमेटी कडुन सत्कार करन्यात येनार आहे.फोरमची विस्तार बांधनी व संघटन मजबूत करन्यासाठी समाजसेवकांनी फोरम मधे सामील व्हावे, ऊपस्थित रहावे.असे आवाहन प्रसिद्धि प्रमुख शोएब कच्छी व राष्ट्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी यांनी केले आहे.

