google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

शहरातील सांडपाणी वाहून नेणा-या नाल्यांची सफाई त्वरित करा

राष्ट्रवादी श.प.युवती काँग्रेस अध्यक्षा माधुरी कटकोजवार यांची मागणी

चंद्रपूर:-  नुकत्याच चंद्रपूरात आलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरातील प्रामुख्याने मित्रनगर, जटपुरा,भानापेठ तुकूम आदी विविध प्रभागातील रस्त्यांवर तेथील सार्वजनिक नाल्यांचे सांडपाणी वाहताना दिसले.

 

 

चंद्रपूर महापालिकेने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित पावसाची झड लागण्यापुर्वीच या प्रभागांसह शहरातील इतर प्रभागातील सांडपाणी वाहून नेणा-या नाल्यांची सफाई करण्याचे काम महानगर पालिकेच्या संबंधित विभागाने करावे अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा तथा जर्नलिस्ट कु. माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांनी केली आहे.

 

जेनेकरून या पावसाने रस्त्यावर येणा-या सांडपाण्यामुळे परीसरातील नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होणार नाही. या मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

Share
Back to top button