google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावती शिवसेना ( ऊ.बा.ठा.) ॲक्शन मोडवर

भद्रावती : शिवसेना पक्षप्रमुख माननीय ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भद्रावती तालुका व शहर कार्यकारीणी जाहिर केली असुन तालुका प्रमुख नरेश काळे, शहर प्रमुख बंटी हेमके,शहर संघटक बंडु चटपल्लीवार व शहर समन्वयक पदावर विनोद कोळसे या निष्ठावंत व सक्रिय शिवसैनिकांची नियुक्ति केली आहे.सदर नियुक्ति मुळे शिवसैनिकांमधे चैतन्यमय वातावरण निर्मिती झाली आहे.

 

ऊद्धवाची शिवसेना भद्रावती ॲक्शन मोडवर आली असुन चंद्रपुर जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजणे यांचे आदेशानुसार भद्रावती शहरातील जनतेला भेडसाविनाऱ्या समस्यांना वाचा फोडुन त्या मार्गी लावन्याचा श्रीगणेशा दिनांक २३ जुन पासुन करन्यात आला आहे.या निमित्ताने सतत विज पुरवठा खंडीत करुन ग्राहकांना वेठीस धरनाऱ्या व स्मार्ट मिटर लावन्यास सक्ती करनाऱ्या भद्रावती च्या महाविरण अभियंत्यांना शिवसेनेने जाब विचारला.
” स्मार्ट मिटर सक्तीने लावल्यास मिटर फोडुन टाकन्यात येईल व विजेचा लपंडाव बंद करा ” महावितरण ला अशी तंबी देन्यात आली आहे .
“बाळासाहेब ठाकरे चौकातील जिवघेनी वाहतुक नियंत्रित करा” या मागणीसाठी भद्रावतीचे पोलीस निरिक्षक साहेबांना निवेदन देन्यात आले.निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देवुन येत्या ऑगष्ट पर्यंत नागरिकांना समस्येपासुन दिलासा देन्याचे कबुल केले.

“शहरातील अवैद्य धंद्यांना चाप ”
शहरात अवैद्य धंद्यांना ऊत आला असुन अनेक नागरिकांच्या तक्रारी शिवसैनिकांकडे येत असतात.त्यामुळे अवैद्य धंद्यांवर बंदी आनन्यासाठी शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे भद्रावती तर्फे माननीय पोलीस निरिक्षक साहेबांना निवेदन देन्यात आले.

निवेदन देतांना तालुका प्रमुख नरेश काळे,उप शहर प्रमुख अरविंद खोबरे,शिवसैनिक राजु तांगडे,पंकज खोब्रागडे, सतिश सुर्यवंशी, चंद्रभान राउत, मारोती सिडाम, अशोक वाणी,उषा आमटे, नंदाताई कुटेमाटे जयाताई धुडे,वैशाली मालेकर,लता निखार,मंगला दुर्गे,कुणाली वानखेड़े,माधुरी वाघाडे,यामीनी ताठे ई.शिवसैनिकांचा समावेश होता.

Share
Back to top button