भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा पद नियुक्ति तथा परिचय मेळावा

चंद्रपुर :- भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा विस्तार करन्याच्या दृष्टिने व चंद्रपुर गढ़चिरोली जिल्ह्यात फोरम भक्कमपने संघटीत करन्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर काही पदाधिकारी नियुक्त झाले आहे,अनेक ठीकानी शहर व तालुका प्रतिनिधि जलद गतीने नियुक्त करुन फोरम ला गतीशील करायचे आहे. पदाधिकारी व प्रतिनिधिंचा परिचय करुन त्यांचे ओळख पत्र (IDENTIFY CARD) वितरण करायचे आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचा राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विस्तार कसा करता येईल व संघटनेचे कार्य जोमाणे करण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन केले जानार आहे. आपल्या कडुन सुचना व मनोगत अपेक्षित आहे.
फोरम नेआज पर्यंत जे काही सामाजिक कार्य जनहितैषी कार्य केलेले आहे,त्या बाबत कोर कमेटी कडुन आढावा घेऊन पुढिल आंदोलनाची रुपरेषा तयार करुन भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया कार्य करनार आहे.मा.अय्युब भाई कच्छी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया,मा. शोएब भाई कच्छी राष्ट्रीय प्रसीद्धी प्रमुख, मा.अरशद कच्छी राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग, चंद्रपुर महानगर अध्यक्ष मा. देवेंद्र हिंगोरानी, मा.जेष्ठ केन्द्रीय कोर कमेटी सदस्य तथा भद्रावती वरोरा तालुका अध्यक्ष नागेंद्र चटपल्लीवार, माजी जिल्हा अध्यक्ष, मा. दिनेश मिश्राजी, मा. सरफराज खान पठाण भद्रावती शहर अध्यक्ष तसेच अहेरी,आलापल्ली येथील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याचे आव्हान मा , शोएब भाई कच्छी तथा देवेंद्र हिंगोरानी यांनी केले आहे.
मेळाव्याची तारीख ठरली नसुन,मेळावा २१ किंवा २८ जुन २०२६ या संभावित तारखेला स्थळ – शासकिय विश्राम गृह चंद्रपुर ला होईल. दुपारी २.०० वाजेपासुन मेळावा सुरु होईल. फोरम तर्फे लवकरच मेळाव्याची अधिकृत तारीख घोषित करन्यात येईल.

