google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

फोरम च्या तालुका अध्यक्ष पदी नागेन्द्र चटपल्लीवार तर शहर अध्यक्ष पदावर सरफराज खान पठाण नियुक्त

भद्रावती : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नागेन्द्र चटपल्लीवार यांची तर भद्रावती शहर अध्यक्ष पदावर सरफराज खान पठाण यांची नव्याने नियुक्ति करण्यात आली आहे.सदर नियुक्ति रविवार दिनांक १० मे रोजी विश्राम गृह चंद्रपुर येथे झालेल्या फोरम च्या बैठकीत करण्यात आली आहे.

भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांनी नियुक्ति केली.याप्रसंगी फोरम चे चंद्रपुर महानगर अध्यक्ष श्री देवाभाऊ हिंगोरानी, श्री दिनेश मिश्राजी व सदस्यगण ऊपस्थित होते. सदर नियुक्तिचे पत्र व ओळखपत्र बहाल करुन नियुक्ति बद्दल व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देन्यात आल्या.

जनतेला भेडसाविनाऱ्या समस्यांना शासन दरबारी वाचा फोडुन जनतेला दिलासा देनार असल्याचे मनोगत या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Share
Back to top button