google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

नगर परिषद तर्फे लावण्यात आलेल्या पाणपोई शोभेची वस्तू ठरत आहे

भद्रावती (सरफराज खान पठाण शहर प्रतिनिधि) : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असून नागरिक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे हाल होत आहे. जनतेची पाण्यासाठी भटकंती होत चालली आहे. मागील वर्षी नगर परिषद भद्रावती तर्फे काही महत्वाच्या ठिकाणी पाणपोई लावण्याचा उपक्रम घेऊन बस स्थानक, नागमंदिर, बाजार चौक आणि नगर परिषद जवळ पाणपोई उभारण्यात आल्या, सुरवातीला काही दिवस सर्व पाणपोई सुरळीत होत्या परंतु नंतर या चार पैकी एकच पाणपोई नगर परिषद जवळची सुरु आहे बाकीची तीन फक्त शोभेची वास्तू बनून उभी आहे. या तीन बंद पाणपोई पैकी बस्थानक मधील पाणपोई महत्वाची असून ये जा करणाऱ्या प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे, शेवटी त्यांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या कडे नगर परिषद चे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. या वरून असे समजावे लागत आहे कि, प्रशासन सुस्त आणि जनता त्रस्त.

ही पाणपोई योजना जरी जुन्या नगराध्यक्षाची असली तरी नविन नगराध्यक्षांनी लक्ष देवुन संंपुर्ण पाणपोई पुर्ववत सुरु करुन वाटसरुंची व नागरिकांची तृष्णा त्रृप्ती करावी.अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

Share
Back to top button