google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आरोग्य व शिक्षण

अवयव दानासाठी पुढाकार घ्या – शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे

चंद्रपूर, दि. 5 : एक व्यक्ती मरणोत्तर आपल्या अवयवांचे दान करून आठ रुग्णांना नवीन जीवन देऊ शकतो. हे खरेच महान कार्य असून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले.

 

 

जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे अवयवदान दिनानिमित्त जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, समाजसेवा अधिक्षक उमेश आडे उपस्थित होते.

यावेळी अवयवदानाचे महत्त्व विषद करतांना डॉ. चिंचोळ म्हणाले, किडनी, हृदय, यकृत (लिव्हर), डोळे, त्वचा, रक्त, हाडे, प्लाझ्मा इत्यादींचे दान करून आपण मरणोत्तर देखील अनेकांना जीवनदान देऊ शकतो. तसेच NOTTO (National Organ and Tissue Transplant Organisation) ABDM या संकेतस्थळांवर जाऊन अवयवदानासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.हेमचंद कन्नाके यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button