विधान सभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून ७५ लक्ष रुपये रोकड जप्त
पोलिस प्रशासनाची मोठी कारवाई

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाऱ्यांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले
असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29/10/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली असता सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.