google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

शासनाची दिशाभूल करून शासकिय कागदपत्रात खोडतोड करुन जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय नौकरी करणाऱ्या कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद यांच्यावर कार्यवाही कधी? राहुल कुकडपवार यांचा सवाल

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात कु शुभांगी रमेशचंद्र हमंद या सध्या प्राथमिक शिक्षिका शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा येथे कार्यरत असून यांनी शासनाची दिशाभूल करून शासकिय कागदपत्रात खोडतोड करुन जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन जातीने त्या मुळच्या वंजारी असुन त्यांनी स्वत:ला बंजारा या जातीचे दाखवुन शासकीय नोकरीचा उपभोग घेत असल्याचे प्रकरण राहुल कुकडपावार यांची उघडकीस केले आहे.

 

तरी या प्रकरणात राहुल कुकडपवार यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी केली आहे. कू शुभांगी रमेशचंद्र हमंद यांच्यावर कार्यवाही कधी होणार? असा सवाल राहुल कुकडपवार यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.

कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद ह्यांनी शासनाशी केलेल्या इतक्या मोठ्या फसवणूकि बाबत माहितीच्या अधिकारात काही विषयांची माहिती श्री राहुल कुकडपवार ह्यांनी माहिती मागितीली असता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा येथील प्रभारी मुख्याध्यापक कु जयश्री राऊत ह्यांनी वेळ उलटून गेल्यावर सुद्धा आजपावेतो ती माहिती तर त्यांना दिलीच नाही या उलट कु शुभांगी रमेशचंद्र हमंद ह्यांचेशी सांगनमत करून राहुल कुकडपवार ह्यांचेविरोधात अनेक वेळा खोट्या नाट्या पोलीस तक्रारी दाखल केल्या या सर्व प्रकरणात कु शुभांगी रमेशचंद्र हमंद ह्यांचे अतिशय निकटवर्तीय सोबतच कु हमंद ह्यांचे सोबत अतिशय सुमधुर व दृढ संबंधात असलेले त्याच शाळेवर कार्यरत असलेले पुरुष अधीक्षक धनेश पोटदुखे ह्यांनी राहुल कुकडपवार ह्यांना ” तु जर हे प्रकरण उघडकीस आणले तर आमच्या शाळेतील सर्व कर्मचारी तुझ्याविरुद्ध ग्रुप ने पोलीस तक्रारी करून तूला बरबाद करून टाकू ” असे धमकाविले तसेच त्यांना धमाकावण्यासाठी त्यांचे घरी 1 वेळा नकली पोलीस सुद्धा धाडलेले होते हे विशेष.!

 

यासोबतच विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे शुभांगी हमंद ह्यांच्याकडे काही महिन्या आधी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 2 चंद्रपूर, ह्याचा प्रभारी गृहपाल म्हणून कार्यभार असतांना त्यांनी अनेक प्रकारचा आर्थिक भ्रष्टाचार वसतिगृहातील अनेक बाबतीत केला होता. त्यामुळे प्रकल्प अधिकारी श्री राचलवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर ह्यांनी त्यांची हकालपट्टी त्यांच्या मूळ आस्थापनेवर म्हणजेच शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा येथे केली होती. म्हणजेच शासनाची फसवणूक करण्याचा कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद ह्यांनी खेळच मांडलेला आहे असे म्हणायस काहीही हरकत नाही.

शासकीय कागदपत्रात खोडतोड हा अक्षम्य गुन्हा असतो त्यामुळे कु शुभांगी रमेशचंद्र हमंद ह्यांचेवर तातडीने फौजदारी कार्यवाही करून त्यांना शासकीय सेवातून त्वरित बडतर्फ करून तुरुंगाची वाट दाखवावी असे निवेदन राहुल कुकडपवार ह्यांनी ज़िल्हाधिकाऱ्यांना देऊन, सत्याची बाजू पुराव्यासहित मांडून लवकरात लवकर कार्यवाहीची करण्याची मागणी निवेदना मार्फत केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button