घुग्घुस येथील बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलावर 22 नोव्हेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी
चंद्रपूर : घुग्घुस शहरात रेल्वे पुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही व वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३० जून २०२४ पर्यंत अधिसूचना जारी करण्यात आली होती. तथापि, या कालावधीत रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण न करण्याबाबत आर.के. माधनी कॉर्पोरेशन आणि गिरिराज कंपनीचे पत्र प्राप्त झाल्यामुळे, 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत आदेश जारी केला आहे. मात्र वाहनांची ये-जा सुरूच आहे.
तरी अवजड वाहतूकदारांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
1. घुग्घुस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतूक बंद राहील.
2. घुग्घुस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओव्हर ब्रिज ते वणी हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद राहील.पर्यायी मार्ग:
1. वणीकडून घुग्घुसकडे येणारी अवजड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकते.
2. वणी येथून घुग्घुस बस स्थानकावर जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाताळा-वरोरा-भद्रावती-ताडाळी-पाडोली घुग्घुस मार्गाचा अवलंब करावा.
3. पडोली – भद्रावती – वरोरा या मार्गाने घुग्घुस ते वणी या मार्गाचा अवलंब करावा. जनतेने वरील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. मात्र घुग्घुस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक आदेशाकडे दुर्लक्ष करून वाहने चालवण्यास देत आहेत.