google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ची वाळू तस्करावर कारवाई

तब्बल १,५१,२०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात वाळलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्याची चांगलीच कमर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तथा पोलिस प्रशासन चंद्रपूर ने कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पर्शभुमिवर एक मोठी कारवाई चंद्रपुरात पाहायला मिळाली आहे. दि.20/03/2024 रोजी रात्री दरम्यान पोलीस अधीक्षक साहेब यांना विश्वसनीय सुत्राकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा अजयपुर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकमध्ये अवेध्यरित्या रेती चोरी सुरू आहे. अशाखबरे वरून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खाजगी वाहनाने अजयपुर गोंडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जावून पाहणी केली असता रोडवर संशईतरित्या एक बोलेरो पिकअप गाडी क्र. MH34BF 1809 हि दिसून आली गाडीमध्ये मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा. संजय नगर चंद्रपूर निळून आला. त्यास सोबत घेवून अंधारी नदीचे पात्रात गेले असता रेती भरून असलेले 3 हायवा ट्रक दिसून आले. पोलीसांची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी त्यांचे ताब्यातील हायवा ट्रक मधील रेती नदी पात्रात रिकामी केली. हायवा ट्रक क्र. 1) MH34BG58522) MH34BG05853) MH34BG5861 4) रेतीचे उत्खनन करीता वापरलेले एक KOBELCO कंपनी ची पोकलैंड मशिन मिळून आली मशीन चालक नामे आकाश गावंडे रा. गोंडसावरी हा अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला.

नमुद तिन्ही हायवा, बोलेरोगाडी, पोकलॅन्ड मशीन चे चालकाने अंधारी नदी पात्रातून रेती गोण खनिजाचे उत्खनन करून 1) नमुद 3 हायट्रकमध्ये प्रत्येकी 8 ब्रास अ.कि.5000/-रू. असा एकूण 24 ब्रॉस 1,20,000/- रू.ची रेती चोरी करून 2) तिन हायवा ट्रक प्रत्येक हायवा 25,00,000/-रू. असे 75,00,000/-रू.. 3) बोलेरो पिकअप अ.कि. 5,00,000/-रू. 4) पोकलैंड मशीन अ.कि. 70,00,000/-रू. असा एकूण 1,51,20,000/- रु.चा माल जप्त करण्यात आला.

नमुद प्रमाणे रेती व रेती चोरी करीता वापरलेले वाहने पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे 1) बोलेरो चालक नामे मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा. संजय नगर चंद्रपूर 2) हायवा चालक नामे श्रावणकुमार लालुप्रसाद पाल वय 28 वर्षे रा. छोटा शिवमंदीर वार्ड, चंद्रपूर ३) हायवा चालक नामे सुनिल लक्ष्मण जांगडे वय 39वर्षे रा. मातानगर वार्ड, चंद्रपूर 4) हायवा चालक नामे सफन सहादेव समाजपती वय 54वर्षे रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर (5) पोकलैंड मशीन चालक नागे आकाश गावंडे रा. गोंडसावरी ता. मुल जि. चंद्रपूर यांचे विरूद्ध पो.स्टे.मुल जि. चंद्रपूर येथे अप.क्र. 118/2024 कलम 379, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button