google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

शेगाव (बु) येथील वाळू तस्कारावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एकूण १८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चांगलीच कमर कसली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचा सुदर्शन चक्र फिरत आहे. स्थनिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 09.05.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या बोथली नदी घाटातुन ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक करुन सावरी, गिरोला व आबमक्ता परीसरात करणार आहेत अश्या खबरेवरुन ने पहाटे 07.30 वा. दरम्यान सावरी ते गिरोला रोडवर कर्मविर शाळेजवळ सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवून वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळून आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती बोथली नदीघाट येथुन चोरुन आणुन मौजा सावरी, गिरोला परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले.

 

सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं. 15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 18,00,000/- असा एकुण 18,15,000/-रु. (अठरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) सुनिल शालीक गायकवाड वय 30 वर्षे रा. खानगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर 2) रविंद्र अंबादास काळसर्प वय 35 वर्षे रा. बेंबडा ता. वरोरा 3) नितेश नथ्थुजी झाडे वय 33 वर्षे रा. अमरपुरी ता. चिमुर व मालक नामे 4) प्रविण शंकर मोहारे वय 35 वर्षे रा. गिरोला ता. वरोरा 5) दामोधर ताराचंद शेंडे वय 51 वर्षे रा. गुजगव्हाण ता. चिमुर पाहीजे आरोपी नामे 6) प्रशांत उर्फ माकोडा जनार्धन शामकुळे वय 40 वर्षे रा. खडसंगी ता.चिमुर यांचे विरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button