13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय धनगर जमात मेळावा व गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन
पालकमंत्री श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार व विधान परिषद सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांची विशेष उपस्थिती

स्थानिक चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे दि 13 ऑगस्ट रोजी धनगर जमात सेवा मंडल जिल्हा चंद्रपूर तर्फे जिल्हास्तरीय धनगर जमातीचे प्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थी तसेच अन्यक्षेत्रातील विविध प्रतिभाषाली व्यक्तींचे यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. धनगर आरक्षण लढाई बद्दल प्रबोधन तसेच धनगर जमातीतील विविध गंभीर समस्या व मुद्द्यांचे विचार मंथन या सोहळ्यामध्ये होणार आहे तसेच दहावी, बारावी, विद्यापीठ स्तरीय, सरपंच अन्य सदस्य व अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिभाषाली कार्य करणारे व्यक्तिमत्व यांचा सत्कार होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख उद्घाटक चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री, वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री
*सुधीर भाऊ मुनगंटीवार* राहणार आहे तसेच विधान परिषदेचे
*आमदार मा. श्री गोपीचंद पडळकर* हे विशेष अतिथी म्हणून लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष
डॉ मंगेश गुलवाडे, जिल्हा अध्यक्ष धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री श्याम वाकर्डे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प चंद्रपूर राहणार आहे. या जिल्हास्तरीय प्रबोध मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व धनगर जमात बंधू-भगिनी, युवा, नागरिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन धनगर जमात सेवा मंडळ, जिल्हा चंद्रपूर तसेच धनगर जमात युवक युवती मंच, महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, राजमाता अहिल्यादेवी महिला मंडळ, जय मल्हार जेष्ठ नागरिक संघ, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8421026883