google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

एम.डी. अमली पदार्थ प्रकरणातील महिला आरोपीचा शोध सुरू

माहिती देण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर ( का. प्र ) : एम.डी. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुंबई येथील मुबीन अब्दुल्ला शेख या महिला आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे. सदर महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

दिनांक 25 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ओम संतोष ईटनकर (वय 20 वर्षे, रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर) यास जटपुरा गेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या अंगझडती व घरझडतीदरम्यान एम.डी. पावडर आणि मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 23 हजार 470 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान उर्फ भुऱ्या इसलाईल पठाण (वय 35 वर्षे, रा. बगळखिडकी, चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत एम.डी. अमली पदार्थाच्या पुरवठ्याप्रकरणी मुबीन अब्दुल्ला शेख (रा. बाबुराव शेठ चौक, क्रॉफर्ड मार्केट परिसर, मुंबई) या महिलेचे नाव समोर आले असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

*महिलेचे वर्णन :* वय अंदाजे 65 वर्षे, उंची 5 फूट, चेहरा लांबट व सुरकुत्या असलेला, शरीरयष्टी मजबूत, रंग सावळा, केस काळे-पांढरे व लांब, पेहराव साडी व ब्लाउज असून ती मराठी आणि हिंदी भाषा बोलते.

सदर महिला कोठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या 07172-253200 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा तपासी अंमलदाराच्या 9923701692 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी योगेश हिवसे यांनी केले आहे.

Share
Back to top button