आपला जिल्हा
संविधान दिनानिमित्त ऑटो रिक्षा असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भद्रावती: भारतीय संविधान दिनानिमित्त ऑटो रिक्षा असोसिएशन भद्रावतीच्या वतीने जुना बसस्थानक परिसरातील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले हक्क, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला ऑटो रिक्षा असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रकाश मेंढे, कार्यकारिणी सदस्य शशी कवाडे, राहुल रामटेके, बबलू पठाण, संजय शेंडे, गणेश गजलेकर, विश्वजित, संदीप महाडोळे, हर्षवर्धन चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.
माल्यार्पण करून संविधान दिन उत्साहात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला.

