google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

तुकूम येथील श्री संजीवनी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स बाबत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप?

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

चंद्रपूर : तुकूम परिसरातील ताडोबा रोडवरील श्री संजीवनी मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या कामकाजाबाबत औषध विक्रीसंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रतिष्ठान मागील काही वर्षांपासून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून व्यवसाय करीत असल्याचा दावा प्राप्त माहितीतून करण्यात आला आहे.

 

नियमानुसार औषध विक्री करणाऱ्या दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, संबंधित मेडिकलमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट केवळ कागदोपत्री दाखवला जात असून प्रत्यक्षात त्याची नियमित उपस्थिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांद्वारे समोर आली आहे.

याशिवाय, संबंधित प्रतिष्ठानचे मालक चांभारे हे शासकीय सेवेत वन अकादमी, मूल रोड, चंद्रपूर येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शासकीय सेवेत कार्यरत असताना ते संध्याकाळी सुमारे ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत मेडिकलमध्ये उपस्थित राहून, सर्रासपणे औषध विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर येत आहे.

या प्रकरणामुळे शासकीय सेवेशी संबंधित नियम तसेच औषध विक्रीसंदर्भातील अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन होते आहे का??याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभाग या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणार का??, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित मेडिकलचे मालक, संबंधित शासकीय विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Share
Back to top button