पालकमंत्र्यांना लाॅयड मेटल्स चा विकास करुन गडचिरोली जिल्हा भकास करायचा आहे की काय ?
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चा सरकार ला प्रश्न

२६ ऑगष्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली.गडचिरोली हा चंद्रपुर जिल्ह्याचाच हिस्सा होता. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे समृद्धतेने, विविध सौंदर्याने नटलेला निसर्गरम्य कोकण प्रदेश आहे,त्याचप्रमाणे कोकणशी स्पर्धा करनारा विदर्भातील गडचिरोली जिल्हा आहे.आदीवासी जिल्हा म्हणून आजपर्यंत सरकारने या जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले,आता याच जिल्ह्यातील खनीज संपत्तिवर सरकारचा डोळा आहे. लाॅयड मेटल्स व त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी च्या माध्यमातुन निसर्गरम्य गडचिरोली, ऐश्वर्य संपन्न गडचिरोली जिल्ह्यातील वैभव लुटुन लाॅयड मेटल्स च्या घशात घालुन लाॅयड मेटल्स चा विकास व गडचिरोली जिल्हा भकास करन्याचे षड्यंत्र सरकार तर्फे सुरु आहे.
गेल्या दोन वर्षापासुन सुरजागढ येथे उत्खनन सुरु आहे.आता खनीज संपत्ती रात्रीच्या अंधारात चोरी करुन मध्यप्रदेश मार्गे कुठे नेल्या जात आहे? कोनती खनीज संपत्ती नेल्या जात आहे? हे जो पर्यंत जिल्ह्यालाच नाही तर संंपुर्ण महाराष्ट्राला माहिती देनार नाही,तो पर्यंत याला चोरटा व्यवहार म्हटल्या जानार. दररोज रात्रीच्या वेळेतच ट्रकांमधे आमच्या जिल्ह्यामधुन काय नेत आहे? कुठे नेत आहे? लोखंड आहे कि पितळ आहे? सोने, चांदी, हिरे,युरेनिअम,ॲल्युमिनीअम आहे कि कोणते नैसर्गिक खनिज आहे? याबाबत जनतेच्या वतीने भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ला माहिती देनार नाही तो पर्यंत फोरम या बाबतीत विचारना करनार. याच अनुषंगाने भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या शिष्टमंडळाने राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सम्माननीय देवेन्द्रजी फडणवीस यांना माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत दिनांक १५ मे २०२६ ला निवेदनाद्वारे विचारना करन्यात आली होती.
मान.जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या भावना शासनास कळवुन फोरम ला पत्राद्वारे सुचीत करन्यात येईल,असे आश्वासन दीले.दहा दिवसा पर्यंत फोरम ला प्रशासनाने काहीही न कळविल्यामुळे दिनांक २६ मे ला पुन्हा फोरम च्या शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.दिनांक १५ मे २०२६ ला दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देवुन स्मरण पत्र दीले आहे.
जो पर्यंत जनतेच्या वतीने फोरम ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशासन देनार नाही,तो पर्यंत फोरम अनेक स्मरणपत्रां द्वारे सरकार ला प्रश्न करीत राहनार.प्रश्न विचारने हा भारतीय राज्य घटनेने आंम्हाला दिलेला अधिकार आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या निसर्गरम्य परीसराची रक्षा करने, घनदाट जंगल वाचविने व अनेक संपदांनी संपन्न असलेल्या जिल्ह्याला आंम्हाला सदैव संपन्न ठेवायचे आहे. जलसंपदा, वनसंपदा ही निसर्गाने दिलेली देण आहे. सरकारचा यात काहीही वाटा नाही.या जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी आजपर्यंत जपुन ठेवलेले जल, जंगल, जमीन, माणव जीवं व वन्य जीवं नष्ट करुन सरकार ला काय साध्य करायचे आहे? लाॅयड मेटल्स चा विकास व गडचिरोली जिल्हा भकास करायचा आहे कि काय? याचेच उत्तर आंम्हाला पाहिजे आहे.

