चंद्रपुर शहरात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी (शरदचंद्र पवार ) काँग्रेस पक्षातर्फे शांती मोर्चा आंदोलन

प्रतिनिधि – सरफराज खान
चंद्रपुर : दिनांक 20 जुलै 2026 रोज सोमवारला भद्रावती राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी (शरदचंद्र पवार)काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आज विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटविणाऱ्या हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या, त्यांच्या न्यायाच्या लढ्याला दडपून टाकणाऱ्या बेजबाबदार व असंवेदनशील सरकारच्या विरोधात व देशभरातील ‘NEET’ आणि महाराष्ट्रातील ‘TET’ पेपरफुटीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले असून जिल्हा कार्यालय, चंद्रपूर ला निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार भद्रावती नगरपरिषद चे नगरसेवक फय्याज शेख, शहर जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष परभ गिरडकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष दीक्ष पारनंदी प्रदेश, शुभम बगडे, अमोल बडगे, बिपीन देवगडे, रोहित साखरकर, राकेश किनेकर, प्रमोद वावरे, प्रशांत, प्रवीण सिंग,प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, माजी गटनेते संजय वैद्य आदिवासी सेल शहर अध्यक्ष जनार्धन गेडाम, शरद मानकर उपाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण कामगार शहर अध्यक्ष महेश,अरविंद परचाके अनुप बेले अनिल मन्ने उपस्तिथ होते..

