नविन नगरसेवकांनी जवाबदारींची जाणीव ठेवुन कामे करावी

शहर प्रतिनिधि सरफराज खान पठाण द्वारा
भद्रावती : वार्डातील समस्यांची सोडवणुक करने, हे त्या वार्डातील नगसेवकांचे काम असते. वार्डातील कामे करनार म्हणूनच तुमच्यावर विश्वास टाकुन जनतेनी तुम्हांला निवडुन दिले आहे.
नगर परिषदची निवडणूक होऊन सहा महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा निवडून आलेले काही प्रभागाचे नगर सेवक आजही कुंभकर्नाची झोप घेत आहे.त्यांना आपल्या प्रभागातील समस्यांशी काही देणे घेणे नाही असे वाटत आहे. प्रभागातील सांडपाणी वाहुन नेनाऱ्या नाल्या ह्या तुडुंब भरलेल्या अवस्थेत असून साफसफाई झालेली नाही.नाल्यांतील घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असते. प्रभागातील पथदिवे चार ते पाच महिन्यांपासून बंद आहे ते सुरु झालेले नाही. रस्ते खड्डेमय आहे त्यांची दुरुस्ती झाली नाही.
निवडून आल्यानंतर नगर सेवक आणि नगरसेविका यांच्यापैकी कुणीच आपल्या प्रभागाची साधी पाहणी सुद्धा करीत नाही, त्यांना विचारना केली तर ते नेहमी आपल्याच खाजगी व्यवसायाचा व्यस्तपणा दाखवत असतात. ते जेव्हा आपल्या कामात एवढे व्यस्त असतात तर मग निवडणूक का लढविली? आपल्या प्रभागाचा विकास कसा घडवायचा हे ध्येय त्यांनी जोपासला पाहिजे परंतु तसे काही दिसत नाही,फक्त त्यांचे नाव मोठे आणि दर्शन खोटे. बहुतांश प्रभागात हेच चित्र आहे. घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे तरीही याकडे नगर सेवक दुर्लक्ष करीत आहे. भद्रावती शहरातील जनतेने यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली कि काही नवीन कार्य घडविणार परंतु सगळे उलटे झाल्याचे दिसत आहे. या सगळ्या समस्यांकडे नगराध्यक्षांनी जातीने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न सोडवावे असे भद्रावतीकरांचे म्हणणे आहे.

