google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
क्राईम

चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; १ किलो १०९ ग्रॅम गांजासह आरोपी जेरबंद

चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत भिवापूर वार्ड परिसरातून गांजा साठवून विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईत १ किलो १०९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार सपोनि. राजेंद्र सोनवणे हे डी.बी. स्टाफसह पेट्रोलिंग व जुगार रेड तसेच इतर विशेष मोहिमेवर असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, पांडुरंग बानलवार (रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर) हा आपल्या राहत्या घरात गांजा बाळगून त्याची विक्री करीत आहे.

 

या माहितीची खातरजमा करून पंचांसमक्ष पोलिसांनी भिवापूर वार्डातील संबंधिताच्या घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान घरातील पहिल्या खोलीत बेडखाली ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत वाळलेली हिरवी पाने, फुले, देठ व बिया असलेला १ किलो १०९ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ₹१५,००० इतकी आहे.

 

या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Share
Back to top button