युवक कॉंग्रेस तर्फे चंद्रपुरात “ मेलोडी आंदोलन”

चंद्रपुर दिनांक २४ मई २०२६
देशात महागाईने जनता होरपळत आहे गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य माणूस त्रस्त आहे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत NEET पेपर फुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. पण हे सर्व प्रश्न सोडून देशाचे पंतप्रधान फक्त “मेलोडी” ची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत! जनतेच्या प्रश्नांपासून पळणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून चंद्रपूर शहराच्या जटपुरा गेट समोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे मेलोडी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस महासचिव रमीज़ शेख यांच्या नेतृत्ववात हे आंदोलन पार पडले. यावेळी प्रमुखयाने उपस्थित, युवक कॉंग्रेस चे भानेश जंगम,नगरसेवक अभिषेक डोइफ़ोडे,ह.टिपू सुल्तानफ़ाउंडेशन चे अध्यक्ष आमिर शेख सह आबिद ख़ान,कार्तिक सिडाम,अरबाज़ शेख,जावेद ख़ान,युवराज सिंग,अबरार अली सैयद,फ़ज़ी उज़ जमा,बंटी भगत,इरफ़ान शेख, निवृत्ति मेश्रम,फैज़ुल्लाह,मनीष खनके,सतीश कर्लेकर,बाबू नागतोड़,एकनाथ कटारे,सोनू उपाध्याय आदि उपस्थित होते.

