
नागेंद्र चटपल्लीवार द्वारा
भद्रावती : पंचायत समिति अंतर्गत चालविल्या जानाऱ्या “उमेद” संस्थेकडुन महिला बचत गटांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करने,हा उमेद संस्थेचा मुख्य उद्देश्य आहे.हि संस्था गरीब महिलांचे स्वयं सहायता गटं तयार करुन त्यांना संघटीत करने, कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करुन देने, वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देने, आरोग्य पोषण, स्वच्छता, शेती ई. बद्दल जागरूकता निर्माण करने,महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देने हे उमेद अभियानाचे मुख्य ध्येय आहे. परंतु असे उमेद अभियान राबविन्यासाठी उमेद कर्मचारी तालुक्याच्या ठीकानी दिरंगाई करीत असतात.महिलांना आर्थिक दृष्ट्या सुदृढ करन्याऐवजी महिलांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल करीत असतात.अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही होने गरजेचे आहे.
पंचायत समिति भद्रावती (तालुका भद्रावती जिला चंद्रपुर) अंतर्गत उमेद संस्थेचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अरुण चौधरी ग्रामीण बचत गटातील महिलांना मुळ किंमतीपेक्षा दुप्पट किंमतीत मशीनचा पुरवठा करुन त्यांची फसवणूक करुन त्यांची आर्थिक पिळवनुक करीत आहे.महिलांना प्रत्यक्ष बोलावुन त्यांची खाते चौकशी केली तर, सत्य समोर येईल. मुल तालुक्यात सुद्धा कार्यरत असलेले BMM श्री नितिन वाघमारे यांनी सुद्धा वृंदावन प्रभाग संघ, चितेगांव तालुका मुल,जि.चंद्रपुर या गटाला निकृष्ट दर्जेचा मशीन पुरवठा करुन त्यांचे सोबत आर्थिक गैर व्यवहार केला आहे.भविष्यात अनेक महिलांचे संसार वाचवायचे असेल तर सदर कर्मच्याऱ्यांची आता बदली नाही तर कामावरुन बडतर्फ करन्यात यावे.
अशी मागणी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे भद्रावती वरोरा तालुका अध्यक्ष नागेन्द्र चटपल्लीवार यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद चंद्रपुर, माननीय जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपुर, माननीय पालक मंत्री जिल्हा चंद्रपुर, माननीय आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार बल्लारशाह – मुल विधानसभा, माननीय आमदार करणजी देवतळे वरोरा – भद्रावती विधानसभा, आदरनिय शोभाताई फडणवीस माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे मागणी करन्यात आली आहे.

