लाॅयड मेटल्स प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याला शाप की वरदान ?

विशेष प्रतिनिधि नागेंद्र चटपल्लीवार द्वारा
गडचिरोली : लाॅयड मेटल्स एनर्जी तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी ने जनतेला विश्वासात न घेता गडचिरोली सुरजागढ येथे खनीज प्रकल्पासाठी उत्खनन सुरु केले आहे. परंतु प्रकल्पाला मंजूरी आहे काय ? उदा.’ना हरकत प्रमाण पत्र’ प्रकल्पाला लागनाऱ्या अनेक विभागाच्या परवानग्या घेतल्या काय? प्रकल्पातुन कोणते खनिज निघत आहे?प्रकल्पातुन मिळनारे वार्षिक उत्पन्न किती? ई.प्रशनांची उत्तरं लाॅयड मेटल्स व्यवस्थापनाने जनतेला द्यावे. नाहीतर माहितीचा अधिकार पर्याय उपलब्ध आहे.जिल्ह्यात एकच चर्चा जोर धरत आहे हा प्रकल्प आपल्यासाठी शाप ठरनार आहे कि वरदान ?
लायड मेटल्स ने गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेचे जिवनमान सुधरविले,जनतेला उत्कृष्ट शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा, शुद्ध पाणी, रस्ते,नाल्या, रोजगार ई. पायाभुत सुविधा राॅयल्टी फंडातुन प्रदान केल्या तर हा प्रकल्प जिल्ह्याच्या जनतेसाठी वरदान ठरनार आहे. या उलट – वरिल सुविधांपासुन जनतेला वंचित ठेवले तर हा प्रकल्प जिल्ह्याच्या जनतेसाठी शाप ठरनार एवढे निश्चित. हा प्रकल्प दिर्घकालीन चालविन्याची लाॅयड मेटल्स ची योजना असेल तर जनतेच्या सहमतिशिवाय प्रकल्प चालु शकनार नाही. आता लाॅयड मेटल्स व्यवस्थापन काय भूमिका घेते याकडे संंपुर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे लक्ष लागुन आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया जिल्ह्यातिल जनते सोबत असुन जनतेसाठी लवकरच गडचिरोलीला फोरमचे जनसंपर्क कार्यालय सुरु करन्यात येनार आहे.
कार्यालयाची टॅगलाईन असनारआहे.
“जनता के हित में फोरम मैदान में”
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन जनतेच्या समस्या सुटेपर्यंत समस्यांचा पाठपुरावा केल्या जानार आहे .

