google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावती शहरात उष्माघाताने एकाचा बळी

भद्रावती: उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि अशातच उष्मघाताने बळी जानाऱ्यांची संख्या वाढत आहे.राज्य सरकारतर्फे जनतेला सूचना देऊन सुद्धा जनता स्वतःची काळजी घेत नाही. अशातीलच एक भाग म्हणून भद्रावती शहरातील बस स्थानक येथील ऑटो स्टॅन्ड जवळ एक अनोळखी व्यक्ती दुपारी २.०० वाजता भोवळ येऊन खाली पडला आणि हाथपाय झटकू लागला.

 

तिथे उपस्थित असलेले ऑटोरिक्षा असोसिएशनचे उपाध्यक्ष सनमोहन केशवन, ऑटोचालक बबलू पठाण, किशोर कामटकर, संदीप महाडोळे आणि ये जा करणाऱ्यांपैकी दोन नागरिकांनी त्या अज्ञात व्यक्तीला तात्काळ ऑटोचालक बबलू पठाण यांच्या ऑटोत टाकून ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नेऊन त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून त्याचे उपचार सुरु करायला लावले.एक मदतीचा हात आणि माणुसकी या नात्याने त्या व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करण्यात आले परंतु शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू संध्याकाळी ५.०० वाजता झाला. त्या अनोळखी व्यक्तीची माहिती काढली असता तो फुकट नगर भद्रावती येथील रहिवाशी असून त्याचे नाव प्रमोद पेसरवार असे आहे.

Share
Back to top button