
चंद्रपुर :- घरफोडीच्या गुन्हयातील रु.१,७७, ३९०/- रु. किंमतीचा मुद्देमाल मा. न्यायालयीन प्रक्रियाअंती फिर्यादीस सुर्पूद पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरची कामगिरी
दिनांक २० जानेवारी, २०२५ रोजी फिर्यादी श्री विनोद मधुकर अनंतवार रा. बागला चौक महाकाली वार्ड चंद्रपूर यांनी पोस्टे चंद्रपूर शहर येथे रिपोर्ट दिली होती की, ते दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सांय ५:०० वा घराचे दाराला कुलूप लावुन फिरायल गेले व रात्रौ १०:०० वाजता परत आले त्यादम्यान त्यांचे घराचे दाराचे कुलूप तोडुन घरातील आलमारीत ठेवलेले एकुण ३५ ग्रॅम सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप.क्र. ५१/२०२५ कलम ३३१ (४) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला व काही तासाचे आंत गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन आरोपी अटक करुन त्याचे कडुन चोरीतील एक सोन्याची चैन, एक जोड सोन्याचे कानातील लटकन, सोन्याचे डोरले मणीसह असा एकुण १,७७, ३९०/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयातील मुद्देमाल पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे मुद्देमाल कक्षात जमा असल्याने संबंधीत तक्रारदार यांना मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक कागदपत्रे पुरवून मा. न्यायालयीन प्रकियेअंती दिनांक १०/१०/२०२५ रोजी मा. विद्यमान कोर्टातुन सुपूतनामा ऑर्डर प्राप्त करण्यास लावुन मिळालेल्या कोर्ट आर्डर नुसार यातील फिर्यादी श्री विनोद मधुकर अनंतवार रा. बागला चौक महाकाली वार्ड चंद्रपूर यांना त्यांच्या गुन्हयातील चोरीचा हस्तगत केलेला एकुण १,७७, ३९०/- रुपयाचा माल परत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके यांचे नेतृत्वात मपोहवा निता भगत व पोअं शिवाजी गोरे यांनी केली आहे. चोरीतील मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा समाधान झाल्याने परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.