google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

पत्नीचा आसरा घेत, शासकीय आश्रमशाळेच्या, पुरुष अधीक्षकाचा, न्यायालयीन परिसरात, राहुल कुकडपवार यांच्यावर भ्याड हल्ला.!

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा येथे पुरुष अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले भ्रष्ट लचखोर शासकीय कर्मचाऱ्याचा आपल्या पत्नीचा आसरा घेत न्यायालयीन परिसरात राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांच्यावर भ्याड हल्ला

 

सविस्तर वृतनुसार, धनेष पोटदुखे हे शासकीय कर्मचारी, पुरुष अधीक्षक म्हणून, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा येथे कार्यरत आहे. पण त्या आधी ते दिनांक 04/12/2018 ते दिनांक 31/05/2025 म्हणजेच तब्बल 7 वर्षे 3 महिने, शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा, येथे पुरुष अधीक्षक म्हणून कार्यरत होते. एखादा शासकीय कर्मचारी, एकाच आस्थापणेवर, इतका प्रदीर्घ काळ कसा काय राहू शकतो?, याबाबतची विचारणा, भारतीय ऑल मीडिया सुरेक्षा फोरम ऑफ इंडिया या देशव्यापी संघटनेचे, जिल्हाध्यक्ष/ज़िल्हा वार्ताहर, श्री राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, ह्यांनी, अप्पर आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नागपूर, यांना पत्रव्यवव्हाराद्वारे केली होती.

तसेच, धनेष पोटदुखे, बोर्डा येथे, पुरुष अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना, वसतिगृहाशी निगडीत असलेल्या सर्व शासकीय देयकात, तसेच शाळेत आयोजित, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी ला लागणारे साहित्य, जेवण, मंडप, डेकोरेशन, इत्यादी सामग्री पुरवठा करणाऱ्या, स्थानिक कंत्राटदारसोबत, हाथ मिळवनी करून, जास्त रकमेची वाढीव देयके दाखवून, प्रत्येक देयकाच्या रकमेत, ते आपली हिस्सेदारी राखून ठेवायला सांगायचे. अशी तक्रार, संघटनेस प्राप्त झाल्याने श्री राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, ह्यांनी, त्याबाबतची विचारणा सुद्धा, तक्रारवजा निवेदणाद्वारे, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर, यांच्याकडे केली होती.

अप्पर आयुक्ताकडून चौकशी झाल्यास, आपले सगळे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतील, व आपण प्रशासकीय कार्यवाहीत दोषी आढळून, आपल्यावर, प्रशासकीय व दंडात्मक कार्यवाही होईलच, ह्या गोष्टीची, धनेष पोटदुखे ला पुरेपूर कल्पना होतीच. ह्याच भीतीने, त्याने आपल्या पत्नीसोबत संगनमत करून, पूर्वनियोजित कट आखून, ती स्त्री असल्याचा फायदा घेत दिनांक 23/09/2025 रोजी श्री राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार न्यायालयीन कामाकरिता न्यायालयीन परिसरात गेले असतांना “तु माझ्या बायकोच्या अंगावर हाथ टाकतो, अंगावर येतो “, असे खोटेनाटे अभद्र व अश्लील आरोप लावून आपल्या पत्नीसोबत अश्लील शिवीगाळ करून लाठीकाठीने मारण्यास सुरवात केली. “यापुढे माझी तक्रार केल्यास तुला जिवंत मारून टाकु” अशी जीवे मारण्याची धमकी धनेष पोटदुखे याने राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार ह्यांना दिली. ह्या सर्व प्रकारात त्याचा पत्नीचा उत्स्फूर्त सहभाग होता. झालेला हा सर्व प्रकार न्यायालयीन परिसरात असलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. त्यानंतर लगेचच ह्या सर्व प्रकारात राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांचा मोबाईल तसेच घड्याळ चे नुकसान झालेले आहे. त्यानंतर लगेचच राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी स्वतःला सावरत रामनगर पोलीस ठाणे गाठले व झालेल्या संपूर्ण प्रकाराची रीतसर तक्रार दिली त्याच अनुषंगाने पोटदुखे पती पत्नीवर भारतीय न्याय संहिता भादवी कलम 115(2),351(2),352 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सोबतच या संपूर्ण किळसवाण्या प्रकारबाबतची लेखी तक्रार संपूर्ण पुराव्यासहित अप्पर आयुक्त आदीवासी विकास विभाग नागपूर व इतर अधिकाऱ्यांना केलेली आहे.

तरी अश्या हिंसक प्रशासकीय व दंडात्मक कार्यवाहीपासूनच्या बचावासाठी स्वतःच्याच पत्नीचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट लाचखोर पुरुष अधीक्षक धनेष पोटदुखे व त्याच्या पत्नीवर कठोरात कठोर कार्यवाही करून अटक करण्याची मागणी राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेख यांना संघटनेच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदणाद्वारे केलेली आहे.

सोबतच धनेष पोटदुखे सारखा हिंसक मनोवृतीचा शासकीय कर्मचारी हा शासकीय सेवेत राहण्याच्या लायकीया नसल्याने त्याला शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याचे तक्रारवजा निवेदन संपूर्ण पुराव्यासहित राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वूइके यांना त्यांच्या जिल्हाभेटीदरम्यान शिष्टमंडळासोबत भेटून दिलेले आहे.

घडलेल्या संपूर्ण गंभीर प्रकारावर (गुन्ह्यावर) संबधित विभागातर्फे व तसेच प्रशासनातर्फे कठोर पावले उचलून आरोपी धनेष पोटदुखे पुरुष अधीक्षक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा व त्याचे पत्नीवर योग्य ती कठोर कार्यवाही करून पोटदुखे पती पत्नीस तात्काळ अटक करून धनेष पोटदुखे सारख्या हिंसक व भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यास शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना व प्रशासनाला निवेदणाद्वारे केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button