google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

M.D पावडर विक्री करणारे आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर (का.प्र):- चंद्रपुर शहर येथे दिनांक २२/०२/२०२५ रोजी पो.उप.नि. संदिप बच्छीरे सोबत डि.बी. स्टॉफसह पो.स्टे. परिसरात पेट्रोलीगकरित असता मुखबीरद्वारे खबर मिळाली की, एक ईसम नामे अमान खान हा कोहीनूर तलाव मैदान दादमहल वार्ड येथे एम.डि ड्रग विक्री करीता घेउन येणार आहे. त्यावरून मा. पो. नि. मॅडम यांनी सदरची माहिती मा.वरिष्ठांना देवुन सदरची कारवाईकरिता पंच, फोटोग्राफर, वनज मापारी सह खाना होउन घटनास्थळी गेले असता, घटनास्थळी लक्ष ठेवुन असताना खबरेप्रमाणे एक इसम येताना दिसला.

 

त्यास ताब्यात घेउन त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव अमान न्यायत खान पठाण, वय २४ वर्ष रा. बाबानगर बाबुपेठ वार्ड चंद्रपुर असे सांगितले वरून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे उजव्या खिशात प्लॉस्टीक प्रेसलॉक पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर आढळुन आले. नमुद ईसमास त्या पावडरबाबत विचारपुस केली असता, सदर पावडर मेफेडोन ड्रग (एम.डि.) असल्याचे पंचासमक्ष सांगितले. सदर पावडरचे वजन केले असता ९.४० ग्रॅम इतके भरले. किंमत ३०,००० रू., तसेच आरोपीचे अंगझडतीत मोबाईल अॅनड्रॉईड किं. १०,०००रू., मेफेडोन ड्रग (एम.डि.) मोजण्याकरिता वापरलेला इलेक्ट्रॉनीक वनज काटा सिल्वर रंगाचा किंमत ५०० रू., नगदी ३५० रू., असा एकुण ४०,००० रू. चा माल जप्त करण्यात आला. सदर अंमली पदार्थ पावडर बाबत अमान खान यास विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, त्याचे जवळील एम.डि. पावडर हे आवेश कुरेशी देत असतो.

 

आवेश कुरेशी च्या सांगन्यावरून विक्री करतो. मला एक टिकीट (पुडी) विकल्यावर २०० रू. आवेश कुरेशी देत असतो, असे सांगीतले वरून काहि पो. स्टॉफ रखाना होवुन त्यांनी आवेश कुरेशी यास पकडुन ताब्यात घेउन त्यास विचारपुस करून अटक करण्यात आली. यातील आरोपी यांनी आपले आर्थीक फाय‌द्याकरिता पावडर मेफेडोन ड्रग अंमली पदार्थ विक्री करीत असताना मिळुन आल्याने अप.क्र १३२/२०२५ कलम ८ (c), २२ (B),२९ NDPS ACT अन्यये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 

 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पोउपनि. संदिप बच्छीरे, पो. हवा. सचिन बोरकर, संतोष कनकम, म.पो.हवा. भावना रामटेके, नापोशि. कपुरचंद खरवार, पो. अं. इम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली आहे. पुढील तपास Api पंकज बिसाने हे करीत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button