चोरी करणारा आरोपी अवघ्या काही तासात शहर पोलिसांच्या ताब्यात

फिर्यादी नामे रविंद्र विठ्ठल वानखेडे वय ४६ वर्ष, जात महार, व्यवसाय अटर्णी रा. अमराई वार्ड घुग्घुस ता.जि. चंद्रपुर जि. चंद्रपुर दि. ०८/०२/२०२५ रोजी सायंकाळी १९/३० वा. दरम्याण आपल्या कस्टमरला कास्ट प्रमाणपत्र देण्या करीता गौतमनगर वार्ड मार्गे महाकाली कॉलरी चंद्रपुर कडे जात असतांना दोन अनोळखी मुलांनी त्याचे कडुण १) नगदी रक्क्म ५०००/- रूपये २) १५००/- रूपये एक जुना वापरता नोकीया कंपनीचा किपेंड असलेला मोबाईल किंमत अंदाजे ३) ६०,०००/- रूपये एक जुनी वारती होन्डा शईन मोसा. क. एम.एच. ३४ बि.एम. ३१७२ किंमत अंदाजे असा एकुण ६६,५००/- रू चा माल जबरीने हिसकावून पळुण गेले अश्या फिर्यादी वरूण पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अपराध क. ९८/२५ कलम ३०९ (४), ३(५) वि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करूण तपासात घेतला.
सदरच्या गुन्हयाचा गार्भीय लक्षात घेता पोनी श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम यांचे मार्ग दर्शणात डि.बी. पथक प्रमुख पोउपनी संदीप बंच्छीरे व पथक लागलीय घटनास्थळी रवाना हावुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असता, मुखबीर कडुण माहीती मिळाली की, पोस्टे रकॉर्ड वरील आरोपी नामे राजु ऐंगलवार व अक्षय उर्फ मॅक्सी वाघमारे हे दोघे शाईन मो.सा. घेवुन आनंदनगर महाकाली कॉलरी चंद्रपुर परीसरात फिरत आहे. तेव्हा सदर रेकॉर्ड वरील आरोपीतांना पंचा समक्ष ताब्यात घेवुन कसुन विचारपुस केली असता आरोपीतांनी गुन्हयात फिर्यादी कडुण जबरीने १) नगदी रक्क्म ५०००/- रूपये २) १५००/- रूपये एक जुना वापरता नोकीया कंपनीचा किपेंड असलेला मोबाईल किंमत अंदाजे ३) ६०,०००/- रूपये एक जुनी बारती होन्डा शईन मोसा. क. एम.एच. ३४ बि.एम. ३१७२ किंमत अंदाजे असा एकूण ६६,५००/-चा माल चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे १) राजु दिलीप ऐंगलवार, वय ३८ वर्षे, रा. गौतम नगर महाकाली वार्ड, चंद्रपूर २) अक्षय उर्फ मॅक्सी पुडलीक वाघमारे, वय २२ वर्षे, जात महार, रा. आनंदनगर महोली कॉलरी चंद्रपूर यांना दि. ०९/०२/२०२५ रोजीचे ०२/२८ वा. अटक करूण गुन्हयात चोरी केलेला संपुर्ण माल हस्तगत करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक बंद्रपूर, श्री. सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे श्री. संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा/सचिन बोस्कर, पोहवा/संतोषकुमार कणकम, मपोहवा/भावाना रामटेके, नापोका/कपुरचंद खरवार, पोशि/इम्रान खान, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/राहुल चितोडे, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.