महाराष्ट्र अभियंता संघटनेच्या मागणीला यश
13 फेब्रुवारीला होणार सुबे अभियंता साठी काम वाटपाची बैठक

चंद्रपूर :- सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या हितासाठी कार्य करणारी महाराष्ट्र अभियंता संघटनेला मोठे यश मिळाले आहे. काही दिसांपूर्वीच महाराष्ट्र अभियंता संघटनेच्या जिलाध्यक्ष सुदीप रोडे यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता तथा कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनात शासन निर्णय नुसार ३३:३३:३४ प्रमाणे काम वाटप करण्यात यावे व दर महिन्यात सूबे अभियंताची काम वाटपाची बैठक घेऊन सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
त्या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या कामे वाटपाची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे सुशिक्षित बेरोगार अभियंता यांच्या साठी काम वाटपाची बैठक बांधकाम विभागातर्फे घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र अभियंता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुदीप रोडे यांनी दिली आहे.