वनपरिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयामध्ये कोट्याविधी रुपयाचा भ्रष्टाचार?
वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन SIT मार्फत चौकशी करण्याची फोरमची मांगनी

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वनपरिक्षेत्र प्रादेशिक शिवणी कार्यालयात फार मोठा भ्रष्टचार होण्याची माहिती भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाला मिळाली असताना फोरम तर्फे या कामाची sit मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे प्रसिध्दी प्रमुख शोएब कच्छी यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याशी हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन झलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता निवेदन सादर करण्यात आले.
सादर निवेदनात 2020 ते 2021 चा वनपरिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयातील रोखलेखा माहितीचा अधिकार कायदा २००५ कलम ६(१) अंतर्गत मागितले. मागितलेली माहितीचा अवलोकन केल्यानंतर प्रादेशिक शिवणी वनक्षेत्रामध्ये गवत, पाचोळा कापणे, झुडपे कापणे, व गोळा करून जळाई कामेकरीता सुशिक्षित बेरोजगार संस्था वासेरा मजूर पुरवठा केल्याबद्दल मजूर संस्थेला देण्यात आले परंतु सदर कामाचा अहवाल, तपशील, मोजमाप पुस्तिका वनपरिक्षेत्र कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले. सदर रिखलेखाची चौकशी केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधीची अपव्यय गैरव्यवहार समोर येणार म्हणून यांची चौकशी होणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे हे होते यांच्या देखरेख मध्ये हा मोठा भ्रष्टचार करण्यात आला आहे अशी चर्चा समोर येत आहे.
याकरिता भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले व सदर कामाची sit मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदन मार्फत करण्यात आली.