google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच करण्यात येणारी भेसळ, या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज (दि.30) पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल माईन्सच्या आत आणि बाहेर जाणा-या दोन्ही प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. याबाबत खनीकर्म विभागाने तात्काळ तपासणी करावी. तसेच या सीसीटीव्ही चा बॅकअप 90 दिवसांपर्यंत जतन असला पाहिजे. वाहतूक करणा-या वाहनांची नंबर प्लेट सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. प्रत्येक माईन्सचा वाहतूक आराखडा सुनिश्चित केला असतो. या आराखड्याप्रमाणेच वाहनांची वाहतूक होते काय, ते तपासावे. वाहतूक करणा-या वाहनांवर ताडपत्री घट्ट स्वरुपात बांधावी. सुरजागड माईन्समधून वाहतूक करणारी वाहनांची रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजुला पार्किंग होत असेल तर कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

तसेच खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रारी असल्यास खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App