प्रस्थापितांचकडून होणाऱ्या बदनामीला भीक घालणार नाही
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांचे प्रतिपादन

चंद्रपूर : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकीत मी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणुक लढवित आहे. माझ्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळु सरकत चाललेली आहे. त्यामुळे आता माझ्या बदनामीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे,असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी केले.
बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजनांना आम्ही संसंदेत घेवुन जावु हेच आमच धोरण आहे. आणि ते तोरण या आमच्या सगळ्या वंचित बहुजनांनी स्विकारलेल आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची वेळ आल्याने विविध माध्यमातुन माझी बदनामी करण्यात येईल. मी कोणत्याही आरोप प्रत्यारोपांना न घाबरता प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा झेंडा हातात घेवुन लढणार आहे, असे आवाहन राजेश बेले यांनी केले आहे. प्रस्थापित पक्षांनी या राज्यात भ्रष्टाचाराचे राजकारण केले. किडीचा भाग दाखवून छोट्या पक्षांना फोडून त्यांना भाजपमध्ये आणण्याचे काम सुरू आहे आणि जिल्ह्यात प्रदुषन निर्माण केले आहे. त्याचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. जगलात कोणते महोत्सव झालेत. बांबु कसे जळलेत व स्टेडीयम बस स्टॅन्ड कसे कोसळलेत, हे जनतेसमोर मांडण्यात येईल.
चंद्रपूर सह यवतमाळ जिल्ह्यातील ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल प्रचंड अस्मिता निर्माण झाली असून, ओबीसी समाज आता एकत्र झालेला आहे.