जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पर्वावर झालेल्या सत्काराने ज्येष्ठ नागरिक भारावले
माजी सभापती छोटूभाईंनी केला ज्येष्ठांचा गौरव

वरोरा – ध्यानीमनी नसतांना अचानक झालेल्या सन्मानाने वरोरा येथील विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक भारावले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पर्वावर वरोरा नपचे माजी बांधकाम सभापती तथा प्रदेश महासचिव (काँग्रेस असंघटित कामगार) शेख जैरुद्दीन छोटूभाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छोटूभाईनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरोरा शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. ते आपल्या संघाच्या वतीने विविध क्षेत्रात नेहमीच सामाजिक कार्य करीत असतात. पण त्यांच्या कार्याची कुणीही साधी दखल घेत नाही. छोटूभाई यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यालयात छोटासा कार्यक्रम आयोजित करून त्यांचा पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मान केला. सन्मान झालेल्या ज्येष्ठ नागरिककांमध्ये सेवानिवृत्त , आबाजी देवाळकर, गुरुजी ग. म. शेख, गुरुजी प्र विठ्ठलराव सोनेकर मारुतीराव मगरे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी भाऊराव चिवंडे, पाल साहेब, तामगाडगे, विनायक मोहीतकर, गोविंदराव कोहपरे, नत्थुजी भोयर, पांडूरंग रोडे, मारोती मगरे प्र निभराट बुराण सर, माधवराव बोढे, प एडवोकेट दुशेट्टीवार पराते गुरुजी दुशेट्टीवार गुरुजी आगबत्तलवार गुरुजी गुद्धेवर गुरुजी निमसटकरजी लालसरे साहेब माजी कृषी अधिकारी पदुरकर साहेब भोयर गुरुजी कोहळे गुरुजी माथनकर गुरुजी टोंगे मेजर मोहितकर गुरुजी सोनटक्के जी लाईन मेन मते गुरुजी काळे गुरुजी पारखे गुरुजी तिवारी जी ढोक साहेब यांच्यासह 55 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आदींचा समावेश आहे. यावेळी सन्मानाला उत्तर देतांना अनेकांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पर्वावर गौरव झाल्याने सुखावल्याचे सांगत आपल्याला भेडसावत असलेल्या समस्या कथन केल्या. यावेळी नगरसेवक छोटूभाई म्हणाले, सत्कार करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीचे जीवन न जगता आपण सामाजिक कार्याला झोकून दिले आहे. हीच आपली काम करण्याची तळमळच आम्हाला मार्गदर्शक ठरते. आपल्याला भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे छोटूभाई म्हणाले.
संचालन छोटूभाई शेख यांनी केले. आभार अरूण उमरे यांनी मानले. या कार्यक्रमाला धनराज असेकर गुरुजी आशिष ठाकरे अरुण उंभरे गुरुजी मोसिन पठाण शब्बीर शेख आकाश पाठक साहिल कुथे , कैसर शाह, संजय माटे, गुरुजी बाबा पाटील ठाकरे आदी उपस्थित होते.