अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ ची बैठक मुंबई ला संपन्न

अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डि.एन.पाटील यांनी राज्यभरातील तहसील अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधीक दुकानदाराची बैठक नुकतीच मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती ज्याच्या साठी ऑल इंडिया फेअर प्राईज शाॅपकिपर्स फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख ,राष्ट्रीय महासचिव विश्वंभर बसु, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांच्यासह राज्य महासचिव चंद्रकांत यादव, जेष्ठ उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, कोल्हापुर अध्यक्ष राजेश मोरे , सिल्लोड तालुकाध्यक्ष रफिक शेरखान,गणेश डांगी,राधेश्याम कुलवाल, मधुकर बरडे, तात्यासाहेब मगरे, अन्सार शेख, भाऊराव पवार, वसंत चाटे,निलेश देशमुख, कौस्तुभ जोशी, महेंद्र बोरसे आदि उपस्थित होते.सदर बैठकीत केंद्र सरकार कडून वाटप कमिशन वाढ करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून कमिशन वाढ देण्यात यावेत म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.ज्यात इपाॅस मशीन मधील त्रुटींवर हि सोलुशन काढण्यात यावेत म्हणून मागणी करण्यात आली.
यावेळेस राष्ट्रीय महासचिव विश्वंभर बसु यांनी चलो दिल्ली ची हाक देत 8जुन ला राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक व जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसद भवन चा घेराव घालून मागण्या मंजूर करून देशातील सर्व दुकानदार यांच्या समस्यांवर उपाय काढून अडचण दूर करून भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध करून घ्यावेत या साठी सीएससी, गॅस वितरण सह साखर, खाद्य तेल, डाळी रेशन दुकानदार यांच्याकडून वितरण करण्यास सुरुवात होईल असे धोरण सरकार कडून मंजूर करून घेण्यात येईल यासाठीच संघर्ष करीत मार्ग सुकर होईल असा विश्वास व्यक्त केले.